Monday 29 August 2016

चामखीळ घालवण्यासाठी ६ घरगुती उपाय

चामखीळ घालवण्यासाठी ६ घरगुती उपाय

 अनेक लोकांना अंगावर मोस असण्याची समस्या असते. अनेकांच्या स्कीनवर मोस असते. शरीरातील ह्यूमन पापिल्‍लोमा व्हायरसमुळे अंगावर मोस येतात. जे शरिरासाठी धोकादायक नसतात पण शरिराची सुंदरता खराब करतात.

 

स्‍कीन ट्यूमरच्या नावाने देखील हा ओळखला जातो. अनेकदा त्‍वचेवरील असमान वृद्धीमुळे देखील शरिरावर मोस तयार होतात. काही घरगुती उपायांनी तुम्ही देखील ते शरिरावरुन नाहीसे करु शकतात.

मोस नाहीसे करण्यासाठी ६ उपाय :-

१. सफरचंदचं व्हिनेगर : मोसच्या समस्या मुळापासून दूर करण्यासाठी हे अधिक फायदेशीर असतं. रोज कमीत कमी ३ वेळा कापसाने मोसवर हे व्हिनेगार लावा आणि कापूस त्यावर लावून ठेवा. काही दिवसानंतर मोसचा रंग बदलेल आणि तो सुखत जाईल. या शिवाय तुम्ही अॅलोविराचं जेल देखील लावू शकतात.

२. लिंबाचा रस : लिंबाचा रस मोसच्या जागेवर लावल्याने याची समस्या दूर होते. कापसाने लिंबूचा रस मोसवर लावा आणि त्यावर कापूस तसाच ठेवून द्या.

३. बटाट्याचा रस : बटाट्याचा रस किंवा बटाटा बारीक करुन मोसच्या जागी लावल्याने हळूहळू कमी होण्यास मदत होते.

४. अननसाचा रस : मोसपासून सुटका मिळण्यासाठी तुम्ही अननस रस, फ्लॉवर रस, कांद्याचा रस आणि मध वापरु शकता. कारण या सगळ्यांमध्ये मोसला नाहीसा करण्यासाठीचं ऐजाईम्स असतात.

५. बेकिंग सोडा : चांगल्या त्वचेसाठी फायदेशीर असलेला बेकिंग सोडा मोसवर देखील फायदेशीर आहे. बेकिंग सोडा ऐरंडीच्या तेलामध्ये टाकून पेस्ट तयार करा आणि मोसवर ती पेस्ट लावा. काही दिवसांमध्ये तुम्हाला फरक दिसेल.

६. लसून : लसूनचं सेवन अनेक समस्यांपासून लांब राहण्यासाठी महत्त्वाचं आहे. सुंदरतेसाठी देखील लसून तेवढाच फायदेशीर आहे. लसूनच्या पाकळ्या मोसवर घासा किंवा त्याची पेस्ट मोसवर लावा. असं केल्यास काही दिवसात तुम्हाला फरक जाणवेल.


Tuesday 23 August 2016

चांगली बॉडी हवीये...हा आहार घ्या

  चांगली बॉडी हवीये...हा आहार घ्या

  चांगली आणि परफेक्ट बॉडीसाठी हल्ली जिमला जाण्याचे फॅड चांगलेच वाढत चालले आहे. मात्र केवळ जिम जाण्याने तुमची बॉडी परफेक्ट होणार नाहीये तर त्यासाठी तितकाच पौष्टिक आणि योग्य आहार घेणे गरजेचे आहे. जिमला जाणाऱ्यांनी खालील आहार घ्यावा. यामुळे त्यांना नक्कीच परफेक्ट बॉडीसाठी फायदा होईल.

संडे हो या मंडे रोज खा अंडे - तुमच्या दिवसाची सुरुवात उकडलेल्या अंडयांनी करा. सकाळच्या न्याहारीदरम्यान अंडी खाल्ल्यास वजन लवकर वाढेल. अंड्यातील पांढऱ्या भागांत प्रोटीनचे प्रमाण सर्वाधिक असते. तसेच झिंक, व्हिटॅमीन, आर्यन आणि कॅल्शियमचा स्त्रोत आहे. 

चिकन ब्रेस्ट(कलेजी) - जिम जाणाऱ्यांच्या आहारात चिकनचा समावेश अत्यावश्यक आहे. प्रत्येक १०० ग्रॅम कलेजीमध्ये ३० ग्रॅम प्रोटीन असते. 

भरपूर पाणी प्या - आपल्या शरीरात ७० टक्के पाणी असते. त्यामुळे मांसपेशीची ताकद वाढवण्यासाठी पाणी गरजेचे असते. तसेच एनर्जी लेव्हल वाढवण्यासाठी पचनक्रिया सुधारण्यासाठी पाणी अत्यावश्यक आहे. 

अननस खा - जिममध्ये वर्कआउट केल्यानंतर आहारात अननसाचा समावेश नक्की करा. यातील ब्रोमिलीन प्रोटीन पचनक्रियेसाठी फायदेशीर आहे. 

पालक - जिममध्ये जाणाऱ्या पुरुषांनी आहारात पालकाचा समावेश करावा. शाकाहारीसांठी पालक अतिशय फायदेशीर आहे.

बदाम - सुक्या मेव्यात बदामाला अधिक महत्त्व आहे. ताकद आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बदाम खाल्ले जाते. 

फळे, सुकामेवा - मोसमानुसार फळांचे सेवन करा. आहारात अधिक प्रमाणात फळे खा. तसेच सुक्यामेव्याचेही सेवन करा. यामुळे शरीराला चांगले फायदे होतात. यात फॅटचे प्रमाण योग्य असते त्यामुळे ते शरीरासाठी हानिकारक नसते. त्यामुळे जिम जाणाऱ्यांनी अक्रोड, बदाम, काजू खावेत. 

Gyme :
















Note : - Watch Health Tips Video and if you like this video from heart. Please Like and subscribe and share this video