Tuesday 1 November 2016

" THE PERFECT LIFE STYLE "


                           "THE PERFECT LIFESTYLE"              

 हे पाळल्यास तुमच्या पासून आजारपण आणि म्हातारपण दोन्ही लांब राहील....  स्लिम अँड फिट राहाल....
 

1. रात्री जास्तीजास्त उशीर म्हणजे 10.00 ला झोपणे.
2. सकाळी 5.00 -5.30 किंवा त्याचा आत उठणे.
3. ब्रश करायच्या आधी एक लिटर गरम पाणी लिम्बु पिळून हळू हळू एकेक घोट करून पिणे.
4. 10 मिनिटे वज्रासनात बसणे.
5. कमीत कमी फक्त 10 सूर्यनमस्कार जास्तीत जास्त 25 हळुवार पणे घालणे.
5. फक्त 10 मिनिटे प्राणायाम कमीतकमी.
6. रोज न चुकता एक आवळा किंवा अवळ्याचा रस.
7. 8.30-9.00 वाजता भरपूर नाष्टा (या वेळेत जेवण केल्यास उत्तम)
8. 12.30 ला थोडे हलके जेवण.
9. ऑफिस मधेच दर 1 तासानी खुर्चीवरच हात पाय स्ट्रेचिंग करणे.
10. संध्याकाळी 7 - 7.30 ला एकदम कमी जेवण.
11. कंपल्सरी 15 मिनिटे तरी वज्रासन मध्ये बसणे.
12. 10.00 वाजता 1 ग्लास गरम पाणी पिणे आणि 10.00 ला झोप.

★ या खबरदारी घ्या...

*रात्रीच्या जेवणानन्तर चालायला जाणे टाळावे,
किंवा थोडेच चालावे, याला शतपावली म्हणतात....
 म्हणजे शंभर पावले चालणे....
 लोकं 5-5 किलोमिटर घाम गाळत चालून येतात रात्री....

* जेवणाच्या अगोदर अर्धा तास आणि जेवण नंतर एक तासाने पाणी पिणे,
 पचन शक्ती चांगली ठेवायची असल्यास जेवताना अजिबात पाणी पिऊ नये.

* रोज कमीत कमी 3 लिटर पाणी प्यावे.

* फक्त सिजनल फळेच खावी

* सर्वाना हात जोडून विंनती अशी कि कोल्डड्रिंक पिणे टाळावे, खूप वाईट आहे.

* डाव्याकुशीवर झोपावे.

* सकाळी 5 मिनिटे तरी उन्हात उभे राहावे.

* एक लक्षात घ्या, आपले पोटाचे कार्य चांगले चालू असल्यास कुठलाही आजारपण येत नाही, आणि
    वर दिलेले सर्व च्या सर्व उपाय पोटाचे कार्य उत्तम चालण्यां साठीच आहेत.

नक्की वाचा..................................................